गुजरात नव्हे, महाराष्ट्रच नंबर 1 -राहुल गांधी

March 28, 2014 3:54 PM2 commentsViews: 2375

34rahul_gandhi_in_wardha28 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी वर्धा दौर्‍यावर आहे. वर्ध्यामध्ये झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

गुजरातचा फुगा फुटणार आहे, असं म्हणत त्यांनी गुजरातच्या विकासावर टीका केली. देशात महाराष्ट्र नंबर 1 राज्य आहे आणि गुजरातपेक्षा महाराष्ट्राचं विकासाचं मॉडेल उत्तम आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.

काँग्रेसने केलेल्या कामांची यादीही त्यांनी यावेळी वाचली आणि काँग्रेस सत्तेवर आल्यावर सर्वांना आरोग्याचा अधिकार आणि निवार्‍याचा हक्क देण्याचं आश्वासनही दिलं.

 
 

  • Sham Dhumal

    हो गुजरात नव्हे महाराष्ट्रच नं.१ आहे शेतकर्‍यांच्या आत्महत्तेच्याबाबतीत.
    हो गुजरात नव्हे महाराष्ट्रच नं.१ आहे भ्रष्टाचारात.

    • Mondrahul

      Arre Maharashtrath pan Feku vakht ahet tar. Kadhi Gujurat daura kela ka, satya mahit karungyla?

close