बचत गटावर बंदीमुळे 45 हजार महिला रस्त्यावर

March 28, 2014 4:00 PM0 commentsViews: 1084

प्रणाली कापसे, मुंबई.
28 मार्च :  आधी योजना सुरू करायच्या आणि त्या सुरू झाल्या की बंद करायच्या ही स्थिती देशात कायमच दिसून येते. शहरी भागातल्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातल्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या बाबतीतही नेमक हेचं झालं आहे. त्यामुळे एकट्या मुंबईत 45 हजार कुटुंबांवर सध्या मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.

ऐन निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारनं मुंबईतल्या द्रारिद्र्य रेषेखालच्या 45 हजार महिलांना मोठा धक्का दिला आहे. आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील महिलांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मदतीनं चालवली जाणारी महिला बचत गट योजना बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

आजवर या सर्व महिला बचत गटांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळत होतं. त्यामुळे या महिलांना बँकांमधून कर्ज मिळणं सोपं जात होतं. इतकचं नाही तर BMC कडून यांना मोफत प्रशिक्षणही दिलं जातं होतं. पण या सर्व सवलती आता बंद होणार आहेत. त्याऐवजी आता सरकारला परवडणारी नवी योजना सुरु केली जाणार आहे पण महिला बचत गटांचा या योजनेला विरोध आहे.

सरकारनं केलेल्या सर्वेक्षणानुसार, या योजनेची उद्दिष्टं पूर्ण होत नाहीयेत. पण आजवर ज्या बँका सरकारी अनुदान मिळणार म्हणून या महिलांना मदत करत होत्या; त्या बँकानी आपली दारं महिला बचत गटांसाठी आता कायमची बंद केलीयेत. त्यामुळे आता करायचं काय हा प्रश्न मुंबईतल्या या महिलांना पडला आहे.

close