अभिनेत्री नग्माने तरुणाच्या कानफटात लगावली

March 28, 2014 3:30 PM0 commentsViews: 6132

789nagama_news28 मार्च : मेरठमध्ये झालेल्या एका रॅलीत अभिनेत्री नग्माने एका तरूणाच्या थोबाडात चांगलीच लगावली. त्याच झालं असं की, अभिनेत्री नग्मा मेरठमधून काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी उभी आहे.

मेरठमध्ये काँग्रेसच्या एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रचारासाठी नग्मा उपस्थित राहणार असल्याने तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी एका युवकाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण यामुळे संतापलेल्या नग्माने या युवकाच्या चक्क थोबाडीत दिली. ती स्टेजकडे जात असताना ही घटना घडली.

अशी घटना पुन्हा घडली तर ती मेरठमध्ये येणार नाही असंही तिने यावेळी स्पष्ट केलं. आता या प्रकरणी मेरठ काँग्रेस अध्यक्षांनी पोलिसांनी पुरेशी सुरक्षाव्यवस्था दिली नसल्याचा आरोप केलाय.

close