शिवसेनेचे15 उमेदवार जाहीर

March 19, 2009 1:04 PM0 commentsViews: 10

19 मार्च, मुंबई विनोद तळेकर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 22 पैकी 15 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर ही नावं जाहीर केलीत. 15 पैकी सात विद्यमान खासदारांना शिवसेनेने पुन्हा संधी दिली आहे. तर आठ नव्या उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. उरलेल्या सात जणांची नावं एक-दोन दिवसांतच जाहीर होतील. दत्ता गायकवाड, गजानन किर्तीकर, सुरेश गंभीर, भाऊसाहेब वाघचौरे, प्रताप जाधव, सुभाष वानखेडे, प्रा. रवी गायकवाड आणि गणेश दुधगावकर यांना शिवसेनेने नव्याने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. तर ठाणे, कल्याण, रामटेक, सातारा , हातकणंगले, कोल्हापूर, मावळ या मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं अजून निश्चित झाली नाहीत. शिवसेनेनं जाहीर केलेल्या 15 उमेदवारांची नावं पुढीलप्रमाणे – 1) चंद्रकांत खैरे – औरंगाबाद2) दत्ता गायकवाड – नाशिक 3) गजानन किर्तीकर – उत्तर-पश्चिम मुंबई4) सुरेश गंभीर – दक्षिण-मध्य मुंबई 5) मोहन रावले – दक्षिण मुंबई6 )अनंत गिते – रायगड7) शिवाजी आढळराव पाटील – शिरूर8) भाऊसाहेब वाघचौरे – शिर्डी 9) सुरेश प्रभू – रत्नागिरी – सिंधुदुर्ग 10) प्रताप जाधव – बुलढाणा11 ) सुभाष वानखेडे – हिंगोली 12) प्रा. रवी गायकवाड – उस्मानाबाद13) भावना गवळी – यवतमाळ – वाशिम 14) आनंदराव अडसूळ – अमरावती 15) गणेश दुधगावकर – परभणी

close