शिवसेनेचे 6 खासदार आघाडीच्या संपर्कात होते -दुधगावकर

March 28, 2014 6:19 PM1 commentViews: 3596

dudhgaonkar 4328 मार्च : परभणीचे शिवसेना खासदार गणेशराव दुधगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. शिवसेनेच्या 11 खासदारांपैकी 6 खासदार हे सुरुवातीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात होते, असा खुलासा दुधगावकर यांनी केलाय.

पक्ष नेतृत्वाला निर्णय घेता येत नसल्याची टीकाही त्यांनी केली. शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेल्यावर खासदार गणेशराव दुधगावकर यांनी परभणीत पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. जालन्यात जिल्हाप्रमुखाने माझ्यावर दगडफेक केली. मी याबाबत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली, पण त्यांनी काहीही कारवाई केली नाही.

त्यामुळे जिथे सन्मान नाही तिथे राहिलो नाही, असं स्पष्टीकरण दुधगावकर यांनी दिलं. सेनेच्या 11 खासदारांपैकी भावना गवळी, सुभाष वानखेडे, आढळराव पाटील, भाऊसाहेब वाघचौरे, प्रताप जाधव, आनंद परांजपे हे 6 जण निवडून आल्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात होते, असंही ते म्हणाले. यामुळे ऐन निवडणुकीत वादंग निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

  • rahulil.com

    kutre posne bara aahe.. nag posnya peksha

close