हरियाणामध्ये केजरीवालांवर हल्ल्याचा प्रयत्न

March 28, 2014 8:24 PM0 commentsViews: 2115

kejriwal_hariyana28 मार्च : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. हरियणातल्या चरखी-दादरीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला.

हल्लेखाराला ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी पकडलं आणि बेदम चोप दिला. पण आप कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीबद्दल केजरीवाल यांनी खेद व्यक्त केलाय.

अशा प्रकारच्या हिंसक कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होईल, असं केजरीवाल यांनी म्हटलंय. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी करत आहे.

close