अरुण जेटली आणि राजनाथ सिंग सांधणार भाजपमधली दरी

March 19, 2009 2:58 PM0 commentsViews: 2

19 मार्च, मुंबई भाजपमधली दरी सांधण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे सरचिटणीस अरूण जेटली यांनी आज पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांची भेट घेतली. सुधांशू मित्तल यांना पूर्वोत्तर राज्याचे सहप्रभारी केल्यानं जेटली नाराज होते. भाजपच्या दोन महत्त्वाच्या बैठकींपासूनही ते दूर राहिले होते.

close