भारताची विजयी हॅटट्रिक, सेमीफायनलमध्ये धडक

March 28, 2014 11:07 PM1 commentViews: 2279

468_indiavsbangla28 मार्च : टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने बांगलादेशचा 8 विकेट राखून धुव्वा उडवत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. ग्रुप 2 मध्ये शेर-ए-बांगला स्टेडियमवर बांगलादेश विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये भारताने सलग तिसरा विजय मिळवलाय.

बांगलादेशने पहिली बॅटिंग करत भारतासमोर 139 धावांचे आव्हान दिले होते. भारताने याला उत्तर देत 19 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावत 139 धावांचे लक्ष्य पूर्ण केलंय. भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करून विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. या विजयासोबत भारत टी-20 आयसीसी रँकिंगमध्ये नंबर एकच्या स्थानावर पोहचली आहे.

पहिली बॅटिंग करणार्‍या बांगलादेशकडून अनामुल हक 44 धावा तर महमुदुल्लाह याने 33 धावांची नाबाद खेळी केली. पण भारतीय गोलंदाजाच्या भेदक मार्‍यासमोर बांगलादेश टीम 20 ओव्हरमध्ये आठ विकेटवर 138 रन करून गारद झाली. भारताकडून अमित मिश्राने 3 विकेट घेतल्या तर आर.आश्विनने 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सामी आणि भुवनेश्वर कुमारने एक-एक विकेट घेतल्यात.

139 धावांच्या पाठलाग करणार्‍या भारतीय टीमची सुरूवात मात्र खराब झाली. धडाकेबाज बॅटसमन शिखर धवन 1 रन करून पव्हेलियनमध्ये परतला. पण त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने शतकीय पार्टनशिप करत भारताची बाजू भक्कम केली. रोहित शर्माने 5 चौकार आणि 1 षटकार लगावत 56 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोणी आणि विराट कोहली या जोडीने धडाकेबाज बॅटिंग करून टीमला विजय मिळवून दिला. विराटने 3 चौकार आणि 1 षटकार लावून 57 रन्सची नाबाद इनिंग खेळली तर धोणींने 22 केले. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने सलग तिसरा विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.

  • pramod

    nice

close