मोदींच्या पुढाकारानेच झाला होता अलींचा भाजप प्रवेश?

March 29, 2014 2:58 PM1 commentViews: 942

sabir_ali_modi29 मार्च : संयुक्त जनता दलाचे माजी नेते साबीर अली यांच्या भाजप प्रवेशावरून पक्षातला वाद चव्हाट्यावर आला आहे. साबीर अलींना पक्षात घेण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनीच पुढाकार घेतला होता आणि त्यांनी भाजपच्या नेत्यांशी याबाबत चर्चाही केली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

सूत्रांच्या माहितीनुसार नरेंद्र मोदींनी 6 मार्च रोजी गांधीनगरमध्ये साबीर अलींची भेट घेतली होती.  मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी साबीर अलींना पक्षात घेण्याची रणनीती आखली. आणि बर्‍याच उशिरा त्याची माहिती दिल्लीतल्या नेत्यांना देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय. साबीर अलींच्या भाजप प्रवेशाला भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी तीव्र विरोध केलाय.

साबीर अलींचा इंडियन मुजाहिद्दीनचा अतिरेकी यासिन भटकळ याच्याशी संबंध आहे आणि त्यांना पक्षात घेणं म्हणजे भाजपच्या दहशतवादविरोधी भूमिकेशी विसंगत भूमिका आहे, असं ट्विट नक्वी यांनी केलं होतं. तर दुसरीकडे साबीर अली यांच्या भाजप प्रवेशाबद्दल भाजपमधून विनय कटियार आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही या प्रवेशावर टीका केलीये. मात्र भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी साबीर अलींच्या प्रवेशाचं समर्थन केलंय.

या सगळ्या प्रकारानंतर साबीर अली यांनी भाजपला आरोपांसंदर्भात तपासणी करण्यात यावी अशी पत्र लिहून विनंती केलीय. तोपर्यंत पक्षाचं सदस्यत्व देऊ नये असंही त्यांनी सांगितलयं. आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडण्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, संघाचे प्रवक्ते राम माधव यांचा ट्विट करुन तीव्र नाराजी व्यक्त केली. “जेडीयूच्या साबिर अलींना भाजपमध्ये प्रवेश देणं संतापजनक आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या या विरोधातील तीव्र भावना भाजप नेतृत्त्वानं लक्षात घ्यायला हव्यात”

कोण आहेत साबीर अली?
2008-2014 : बिहारमधले राज्यसभेचे खासदार
जेडीयूकडून बिहारमधल्या शिवरहीच्या लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी
नरेंद्र मोदींची स्तुती केल्याबद्दल जेडीयूमधून हकालपट्टी

  • sharad_kul

    shriman Modi yanche pudhakarane sabir ali yancha pravesh zala asel tar Modi yana tyanche paksha karyakrte kinva paksha suddha maf karnar nahi dok thikanavar thevun kontya manasala pakshat pravesh det ahot tyache parinam kay hotil tyamule pakshachi fatfajiti zale yache bhan Modi nasel tar tyani pantpradhapadache swapnch pahije naye va rajakaranatun nivrutti ghyavi

close