‘उमेदवारी मागे घ्या अन्यथा हकालपट्टी’

March 29, 2014 4:34 PM0 commentsViews: 1009

jaswant singh429 मार्च : भाजपचे बंडखोर नेते जसवंत सिंग विरुद्ध भाजप यांच्यातला वाद आता अधिक चिघळलाय. भाजप नेतृत्वाने आता जसवंत सिंग यांना अल्टिमेटम दिलाय.

जसवंत सिंग यांनी आपली बारमेरमधील उमेदवारी आज (शनिवारी) मागे घेतली नाही तर त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा पक्षाध्यक्ष राजनाथ सिंग यांनी दिलाय. लोकसभा निवडणुकीसाठी जसवंत सिंग यांनी बारमेरमधून उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने त्यांची मागणी धुडाकावून लावली होती.

त्यामुळे नाराज झालेल्या जसवंत सिंग यांनी पक्षाविरोधात दंड थोपटले. आणि अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला. पण सिंग रिंगणात उतरल्यामुळे भाजपची आणखी डोकेदुखी वाढली. ज्येष्ठ नेत्यावर कारवाई करावी तरी कशी असा प्रश्न भाजप नेत्यांना भेडसावत होता. पण निवडणुकीची रणधुमाळी लक्ष्यात घेत भाजपने कारवाईसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे आता जसवंत सिंग यांच्या भूमिकेकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

close