‘उद्धवना बाळासाहेबांचं स्मारक सुद्धा बांधता आलं नाही’

March 29, 2014 4:53 PM0 commentsViews: 2646

Image udhav_on_ajit5_300x255.jpg29 मार्च : मुंबई मनपाची सत्ता हाती असताना उद्धव ठाकरेंना स्वतःच्या वडलांचं स्मारकही बांधता आलं नाही अशी खरमरीत टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे उठसूठ शरद पवारांवर टीका करतात, मात्र बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शरद पवारांनाच पुढाकार घ्यावा लागला असा टोलासुद्धा यावेळी अजित पवारांनी लगावला. उस्मानाबादमध्ये डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचार सभेत अजित पवार बोलत होते.

शिवाय शिवसेनेनं राज्यात साडेचार वर्षं सत्ता उपभोगली पण साधा एक कारखानासुद्धा काढला नाही अशा शिवसेनेनं विकासाच्या गप्पा मारू नयेत, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

close