…तर मोदींना विरोध

March 29, 2014 6:32 PM0 commentsViews: 2318

29 मार्च : नरेंद्र मोदी उद्या जर पंतप्रधान झाले आणि त्यांच्याकडून चूक घडली तर माझा त्याला विरोध राहिल. आम्ही मुद्यावर जरी एकत्र आलो असलो तरी जे अयोग्य आहे त्याला आपला विरोधच असणार असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. तसंच एखाद्याने जर चूक केली असले तर सुधारण्याची संधी दिली पाहिजे. 2002 दंगलीत मोदींना क्लीन चिट देण्यात आली आहे. आणि या घटनेनंतर गुजरातचा जो विकास झालाय तो नाकारता येणार नाही. त्यामुळे त्यांनी जे गुजरातमध्ये करून दाखवलं ते देश पातळीवर करू शकता यासाठी त्यांना संधी दिली पाहिजे असंही शेट्टी म्हणाले. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी राजू शेट्टी यांची इलेक्शन स्पेशल ग्रेट भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. राजू शेट्टी यांची ही इलेक्शन स्पेशल ग्रेट भेट तुम्ही पाहू शकता आज रात्री साडे नऊ वाजता फक्त आयबीएन लोकमतवर

close