82 वं साहित्य संमेलनाची सुरुवात अध्यक्षांशिवाय

March 20, 2009 6:44 AM0 commentsViews: 6

20 मार्च, महाबळेश्वर कमलेश देवरुखकर, गणेश काळे 82 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सजीव देखावे, पारंपरिक गाणी आणि लेझीम पथकानं या दिंडीत रंगत आणली. या ग्रंथ दिंडीनं तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी साहित्य नगरीची शान वाढवली. महाबळेश्वरच्या रस्त्यावरून जाताना या दिडीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.साहित्य संमेलनाच्या इतिहासात आजवरचा सगळ्यात ऐतिहासिक निर्णय झाला आहे. 82 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षांशिवायच होणार आहे. त्यामुळे या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षांचे भाषण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. साहित्य संमेलन हे नेहमीच गाजतं. मात्र यंदांचं संमेलन हे विशेष संस्मरणीय होणार आहे. वारकर्‍यांची गर्दी, महामंडळाची बोटचेपी भूमिका आणि महामंडळात नेहमीच असतो त्याप्रमाणे काही ठराविक लायक नावांना विरोध, यामुळेच या संमेलनावर ही वेळ आलीये. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी नियोजित अध्यक्ष आनंद यादव यांचा राजीनामा स्थगित केला आहे.

close