लेकीसुना लोकसभेच्या रिंगणात

March 29, 2014 6:45 PM0 commentsViews: 1698

29 मार्च : लोकसभा निवडणुकीत जवळपास सगळ्याच पक्षांमधून महिला उमेदवारांची संख्या कमी असली तरी उत्तर महाराष्ट्रातून मात्र तीन महिलांना उमेदवारी मिळाली आहे. विशेष म्हणजे त्या मातब्बर राजकीय नेत्यांच्या लेकीसुना आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी मतदार संघातून राष्ट्रवादी तर्फे डॉ. भारती पवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार ए.टी.पवार यांच्या त्या सूनबाई आहेत. रावेरमधून भाजप नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर नंदुरबारमधून विजयकुमार गावित यांची कन्या डॉ. हिना गावीत रिंगणात आहे. विशेष म्हणजे या तीन लेकीसुनांमधील दोघी पेशानं डॉक्टरही आहेत.

close