राणांच्या उमेदवारीला विरोध करणारे खोडकेंची हकालपट्टी

March 29, 2014 7:36 PM1 commentViews: 2383

sanjay_khodke29 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

त्यांनी नवनीत राणांचा प्रचार करायलाही विरोध केला होता. त्यासाठी त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी हे आदेश दिले आहे.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी अमरावतीतून राष्ट्रवादीने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. नवनीत राणा यांचा फारसा राष्ट्रवादीशी संबंधही नसताना त्यांना उमेदवारी दिल्यामुळे अमरावतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू झाली होती. अनेक कार्यकर्त्यांनी नाराजीचे झेंडे फडकावले पण दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते प्रचार करा अन्यथा खड्यासारखं बाजूला करू अशा धमक्या देत असल्याचं समोर आलंय. अखेर आज अमरावतीत पक्षाचं न ऐकणार्‍या कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीने कारवाईचा बडगा उगारलाय.

  • Sunil Mahadeo Tawde

    KA HI JABARDASTI SWATACHYA KARYKARTYANVAR KON AAHE HI NAVNEET RANA

close