राज्यभरात आतापर्यंत 49 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

March 29, 2014 9:22 PM0 commentsViews: 179

234marathvada_farmar29 मार्च : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या हवालदिल शेतकर्‍यांचं आत्महत्या सुरूच आहे. राज्याभरात आतापर्यंत 49 शेतकर्‍यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. अकोल्याच्या बार्शी टाकळी गावातल्या ज्ञानदेव नागे या शेतकर्‍याने पिकांचं नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. अकोल्यातली दोन दिवसांतली ही दुसरी आत्महत्या आहे.

तर बँकांनी सुरू केलेल्या सक्तीच्या कर्जवसुलीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या अंत्रोळीच्या तरूण शेतकर्‍याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रखमाजी लक्ष्मण थोरात असं त्या शेतकर्‍याचं नाव आहे.

रखमाजी थोरात यांचे एकत्र कुटुंब असून शेतीसाठी बँक ऑफ इंडिया आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज त्यांनी काढले होते. आधी दुष्काळ आणि नंतर गारपिटीच्या फेर्‍यात अडकल्यानंतर शेतातील उभे पीक वाया गेलं. कर्जाची थकबाकी वाढत गेली. बँकानी वसुलीच्या नोटिसा पाठविल्याचा मानसिक ताण असह्य झाल्याने रखमाजींनी राहत्या घरी गळफास घेतला.

close