पवारच 25 वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून -मुंडे

March 29, 2014 9:52 PM1 commentViews: 1947

29 मार्च : मी कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून शरद पवार पंतप्रधान होणार हे मी ऐकतोय. आणि आताही शरद पवारांना असंच वाटतंय. त्यांना असं वाटतंय की, यांचे उमेदवार पडतील आणि आपण पंतप्रधान होऊ असं गेल्या 25 वर्षांपासून त्यांना वाटतंय. त्यामुळे पवार गेल्या 25 वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून आहे पण त्यांना काही पंतप्रधानपद मिळाले नाही असं सडेतोड उत्तर भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांना दिलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर खोचक टीका केली होती. “नरेंद्र मोदी म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असंच आहे. देशाच्या लोकांबद्दल काही माहिती नाही आणि घोड्यावर बसायला चालेले अशी खोचक टीका पवारांनी केली होती.

  • raju

    Whats wrong in it sir? Everyone has ambitions as you have.

close