एनटी पुरस्कारांमध्ये आयबीएन लोकमतची बाजी

March 29, 2014 10:30 PM1 commentViews: 393

2014ibnlokmat_nt_awards29 मार्च : आयबीएन लोकमतच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. राष्ट्रीय स्तरावर न्यूज टेलिव्हिजन ऍवॉर्ड्समध्ये आयबीएन लोकमतनं बाजी मारली. नवी दिल्लीत एनटी पुरस्कारांचा भव्य सोहळा पार पडलाय. या पुरस्कार सोहळ्यात आयबीएन लोकमतनं 14 पुरस्कार पटकावले आहेत.

पुरस्कारांची भरारी सुरू झाली ती आयबीएन लोकमतच्या ‘ग्रेट भेट’ या कार्यक्रमाने. एनटी पुरस्कारांमध्ये प्रकाश आमटे यांच्यासोबत घेण्यात आलेल्या ‘ग्रेट भेट’ ला ‘स्पेशल सोशल शो’च्या पुरस्कार मिळालाय. तर मराठी सुपरस्टार भरत जाधव यांच्या ग्रेट भेटला एन्टरटेनमेंट स्पेशल शो विभागात पुरस्कार मिळालाय. एखादी बातमी असो अथवा घटना तीचा सविस्तर आढावा घेणार्‍या रिपोर्ताज कार्यक्रमाला दोन पुरस्कार मिळाले. यामध्ये बेस्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग विभागात आयबीएन लोकमतच्या न्यूज एडिटर अलका धुपकर यांच्या ‘सायलेंट किलर – फ्लुरोसिस’ या कार्यक्रमाला आणि न्यूज डॉक्युमेंटरी ऍवॉर्ड विभागात नाशिकच्या ब्युरो चीफ दीप्ती राऊत यांच्या ‘नरक सफाई’ या रिपोर्ताजला पुरस्कार मिळाला.

तर सोशल एन्व्हायरमेंट अवेअरनेस या विभागात ‘चमत्कार- चमत्कार’ या कार्यक्रमाला मिळालाय. पुरस्कारांची मालिका इथेच संपली नाही तर एन्टरटेनमेंट स्पेशल फिचर विभागात फिचर्स प्रोड्युसर प्रियांका देसाई यांच्या ‘ईद मुबारक’ त्याचबरोबर स्पोर्ट्स स्पेशल विभागात प्रियांका देसाईंच्याच ‘डरना मना है’ या कार्यक्रमानं NT पुरस्कार पटकावले आहेत. ‘आजचा सवाल’ या आमच्या खास कार्यक्रमाच्या प्रोमोला, ‘यंगिस्तान झिंदाबाद’ या कार्यक्रमाच्या शो पॅकेजिंगला तर ‘भेटी लागी जीवा’ या वारी निमित्तच्या खास कार्यक्रमाच्या न्यूज ग्राफिक्सनंही NT पुरस्कार पटकावलेत.

इतकचं नाही तर, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा सन्मान करणार्‍या आयबीएन लोकमतच्या ‘मुक्ता सन्मान पुरस्कार’ सोहळ्यालाही विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. तर आयबीएन लोकमतचे असोसिएट एडिटर प्रफुल्ल साळुंखे यांना बेस्ट टीव्ही न्यूज रिपोर्टर, रेणूका रामचंद्रन यांना बेस्ट टीव्ही न्यूज प्रेझेंटरचा पुरस्कार तर न्यूज एडिटर अलका धुपकर यांना बेस्ट टीव्ही न्यूज अँकर (मराठी) हा पुरस्कार मिळाला आहे. पण हे सगळं शक्य होऊ शकलं प्रेक्षक/वाचकहो तुमच्यामुळे. तुम्ही दिलेली पसंतीची पावतीही पुरस्कारांना सार्थ ठरवत आहेत. तुमचं प्रेम असंच राहु द्या..तोपर्यंत अचूक बातमी ठाम मत पाहा फक्त आयबीएन लोकमत…चला, जग जिंकूया..!!

NT ऍवॉर्ड्समध्ये आयबीएन लोकमतची बाजी

– स्पेशल सोशल शो : ग्रेट भेट : प्रकाश आमटे
– एन्टरटेन्मेंट स्पेशल शो : ग्रेट भेट – भरत जाधव
– बेस्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग : सायलेंट किलर फ्लुरोसिस
– न्यूज डॉक्युमेंटरी ऍवॉर्ड : रिपोर्ताज – नरक सफाई
– सोशल एन्व्हायरमेंट अवेअरनेस – चमत्कार चमत्कार
– एन्टरटेन्मेंट स्पेशल फिचर ऍवॉर्ड – ईद मुबारक
– बेस्ट स्पोर्ट्स फिचर – डरना मना है
– बेस्ट प्रोमो फॉर चॅनल – आजचा सवाल
– बेस्ट शो पॅकेज – यंगिस्तान झिंदाबाद
– बेस्ट न्यूज ग्राफिक्स – भेटी लागी जीवा
– ऍवॉर्ड इनिशिएटिव्ह बाय न्यूज चॅनल – मुक्ता सन्मान
– बेस्ट टीव्ही न्यूज रिपोर्टर – प्रफुल्ल साळुंखे
– बेस्ट टीव्ही न्यूज प्रेझेंटर – रेणुका रामचंद्रन
– बेस्ट टीव्ही न्यूज अँकर-  अलका धुपकर

  • Vinod Lokhande

    अचूक बातमी ठाम मत पाहा फक्त आयबीएन लोकमत…चला, जग जिंकूया..!!

close