वरुण गांधी यांना दिल्ली हायकोर्टानं दिला जामीन

March 20, 2009 8:28 AM0 commentsViews: 3

20 मार्च, नवी दिल्ली भाजपचे तरुण युवा उमेदवार वरुण गांधी यांना दिल्ली हाय कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. उत्तरप्रदेशच्या पिलीभीत मतदार संघात दोन धर्मात तेढ निर्माण होईल असं भाषण 6 मार्चला प्रचार सभेत केलं होतं. हे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला होता.वरुण गांधी यांना आज निवडणूक आयोगाच्या नोटीसला उत्तर द्यायचं आहे. वरुण यांच्या विरोधात उत्तरप्रदेशातल्या पिलिभीतमध्ये आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. वरुण गांधी यांच्या भाषणाची टेप फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवणार नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून पिलभीत जिल्हाधिका-यांनी कलम 153 – अ, 123 – अ आणि 123 – ब या कलामांखाली त्याच्यावर अजामीन पात्र गुन्हा दाखल केला होता. तसंच भाजपलाही नोटीस बजावली होती. टेपमध्ये फेरफार केल्याचा वरुण गांधी यांना विश्वास असेल तर त्यांनी ते सिद्ध करावं, असं आयोगानं सांगितलं आहे.

close