अमरावतीमध्ये आगीत सात जणांचा मृत्यू

March 30, 2014 12:15 PM0 commentsViews: 420
amravati fire30 मार्च :  अमरावती जिल्ह्यात परतवाडा इथं कापड दुकानाला शनिवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.
 
पहाटे साडेतीनच्या सुमाराला या दुकानाला आग लागली. मृतांमध्ये 4 महिलांचा , 2 लहान मुलांचा समावेश आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या कपड्याच्या दुकानातच ओटवाल कुटुंब राहते. या आगीत गोटवाल कुटुंबातील सर्व सात जण होरपळले. त्यानंतर त्यांना ग्रामीण प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
close