योगेश धनगर मृत्यूप्रकरणी 6 पोलिसांना ठरवलं दोषी

March 30, 2014 12:31 PM0 commentsViews: 1744

dhangar30 मार्च : धुळ्याच्या दोंडाईचा पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या योगेश धनगर या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी धुळे विशेष कोर्टाने 6 पोलिसांना दोषी ठरवलं आहे. 26 ऑक्टोबर 2010 रोजी पोलीस कोठडीत योगेश धनगर या तरुणाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र योगेशच्या कुटुंबियांच्या मागणीनुसार योगेशच्या मृतदेहाचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलं.

योगेशचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीनं तसंच गुप्तांगाला शॉक देऊन झाल्याचं सिद्ध झालं आहे. धुळे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर आर कदम यांनी शनिवारी दोषींना शिक्षा सुनावली.
गेली तीन वर्षं या खटल्याचं कामकाज सुरु होतं. किरकोळ कारणावरुन योगेशला अटक करण्यात आली होती आणि नंतर पोलिसांच्या माराहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचं कालच्या निकालानं स्पष्ट झालं. एकूण 9 आरोपींवर आरोप होता त्यातल्या दोघांची निर्दोष सुटका करण्यात आली. हत्येप्रकरणी 7 जणांना दोषी मानण्यात आलं आहे. 6 पोलीस आणि एक डॉक्टर यांना धनगर यांच्या हत्येप्रकरणी दोषी मानण्यात आलं.
विलास साळवे पोलीस कर्मचार्‍याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर एपीआय प्रकाश महाजन, अशोक इंगळे यांच्यासह दोघांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. डॉक्टर पडियार यांना तीन वर्षांच्या कारावासची शिक्षा सुनावण्यात आलीये. पुरावे नष्ट करण्याचा आरोपाखाली त्यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. योगेश धनगर हत्याप्रकरणी संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ माजली होती.

close