गारपीटग्रस्तांना मदतीची ‘प्रेरणा’

March 30, 2014 1:27 PM0 commentsViews: 178

30 मार्च :  मुंबईतील मानखुर्द इथल्या शिवप्रेरणा महिला रहिवासी सेवा मंडळ ट्रस्टच्यावतीने बीड जिल्ह्यातल्या हरिचंद्र पिंपरी गाव, सावरगाव आणि राजेवाडी गावातल्या गारपीटग्रस्तांना नुकतीच आर्थिक मदत करण्यात आली. माजलगाव तालुक्यातील या तीन गावांना गारपिटीने चांगलेच झोडपून काढले होते. यामुळे या गावातील शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. शासनाने या गावातील शेतीची पाहणी करून पंचनामेसुद्धा केले, पण अद्याप कुठल्याच प्रकारची आर्थिक मदत या शेतकर्‍यांना मिळाली नाही. शिवप्रेरणा महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या शेतकर्‍यांना 2 लाख 40 हजार रूपयांची आर्थिक मदत केली. शिवप्रेरणा महिला रहिवासी सेवा मंडळ गेली 14 वर्ष आपातग्रस्त आणि गोरपृगरिबांना मदत करत आहेत.

close