अशोक चव्हाणांना तिकीट का दिलं?- मोदींचा राहुल गांधींना सवाल

March 30, 2014 4:03 PM1 commentViews: 1956
narendra modi30 मार्च :  ‘काँग्रेस भ्रष्टाचाराविरोधात लढते असं राहुल गांधी म्हणतात. मग आदर्श घोटाळ्यातल्या आरोपी अशोक चव्हाणांना तिकीटाचं बक्षीस कशासाठी?’ असा सवाल विचारत मोदींनी आज काँग्रेसवर सडकून टीका केली.
मोदी आज (रविवार) महाराष्ट्र दौर्‍यावर होते. अकोला, अमरावती आणि नांदेड येथे त्यांच्या प्रचारसभा झाल्या. यावेळी त्यांनी दोषी आमदार, खासदार, काळा पैसा, भ्रष्टाचार या विषयावरही त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
दोषी आमदार – खासदारांवर कारवाई करणार – मोदी 

नांदेड येथील प्रचार सभेत अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीवरुन मोदींनी काँग्रेस नेतृत्वावर टीकास्त्र सोडले. ‘दिल्लीतील पत्रकार परिषदेत आदर्श घोटाळ्यात ज्यांचे नाव आहे त्यांच्यावर कारवाई करु असे, सांगितले आणि अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली. अशी कारवाई करायची होती का, असा सवाल मोदींनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केला.
  
वानांच्या विधवांच्या नावचे फ्लॅटसुद्धा काँग्रेसनं सोडले नाहीत कारण  काँग्रेसचं पोट भरतच नाही. कारगिल शहिदांच्या कुटुंबांना ज्यांनी लुटले त्यांना आम्ही सत्तेत आल्यानंतर सोडणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिले. भाजपची सत्ता आल्यानंतर दोषी आमदार- खासदारांवर कडक कारवाई केली जाईल, त्यात भेदभाव केला जाणार नाही.
निवडणूक देशाची मग हिशोब गुजरातचा का मागता?
काँग्रेसचे ‘युवराज’ महाराष्ट्रात येऊन गुजरातचा हिशोब मागतात. गुजरात विकास मॉडेलचा फुगा फुटेल असे वक्तव्य करतात. पण यंदाची निवडणूक ही गुजरातची नसून देशाची आहे. त्यामुळे युवराजांनी आधी युपीए सरकारने देशात काय केले याचा हिशोब द्यावा असं सांगत मोदींनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले.
राहुल गांधींनी विदर्भात येऊन शेतकर्‍यांचे अश्रू पुसले नाहीत
गुजरात विधानसभा निवडणुकीच्यावेळी राहुल गांधींनी गुजरातच्या जनतेलाही खोटी आश्वासन दिली होती. मात्र गुजरातमधील मतदार त्यांच्या आमीषांना बळी पडले नव्हते अशी आठवण त्यांनी करुन दिली. राहुल गांधींनी गुजरातवर टीका करण्याऐवजी गारपीटग्रस्त शेतकयांचे अश्रू पुसायला हवे होते असं मोदींनी सांगितले.
शरद पवारांवर साधला निशाणा
महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवरुन भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘देशाच्या कृषिमंत्र्यांकडे क्रिकेटवर बोलण्यासाठी वेळचवेळ आहे. मात्र, शेतकर्‍यांना वाचवण्याची त्यांना गरज वाटत नाही.’ असंही मोदी म्हणाले. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. विदर्भात शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत, असं सांगत आता महाराष्ट्राला पवार आणि काँग्रेस मुक्त करण्याचे आवाहन मोदींनी केले.

मोदींकडून बाळासाहेबांचं स्मरण

‘बाळासाहेबांना आपल्या हृदयात आहेत’बाळासाहेबांना स्मरुन महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने  विजयी करा, बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.’ असं आज अमरावतीच्या सभेत मोदी म्हणाले. मुंबईसह महाराष्ट्रात मोदींच्या अनेक सभा झाल्या मात्र, एकाही सभेत त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेतले नाही. या सभेत मोदींनी प्रथमच शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांचे नाव घेतले. त्यामुळे शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला.

  • raju

    We can ask same question to FEKU. But he has no answers. Pahle apne daman me zak ke dekho.

close