गरीब कुटुंबातल्या दीपालीची मृत्यूशी झुंज

March 30, 2014 4:29 PM2 commentsViews: 1711

30 मार्च :  जालना जिल्ह्यातील आठवीत शिकणार्‍या दीपाली आदमाने या मुलीला विचित्र अपघात घडल्यानं ती गंभीर जखमी झालीय. शाळेला पाणीपुरवठा करणार्‍या वाहनाच्या मोटारपंपच्या पंख्यात दीपालीचे केस अडकले. डोक्याला मार लागल्यानं दीपाली अदमाने गंभीर जखमी झालीये.

मेंदूला मार लागल्यानं औरंगाबादच्या खाजगी रुग्णालयात दिपालीवर उपचार सुरु आहेत. दिपालीच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिची आई चार घरची धुणी- भांडी करुन पोट भरते. दिपालीचं नीट शिक्षण व्हावं म्हणून तिच्या आईनं तिला जालन्याच्या कस्तुरबा निवासी विद्यालयात ठेवलं होतं.

दिपाली ही वर्गातली हुशार मुलगी असून ती लवकर बरी व्हावी अशी तिच्या वर्गमैत्रिणींची आणि शिक्षकांची इच्छा आहे.

दीपालीला मदत करण्यासाठी तुम्हीही पुढे येऊ शकता. महाराष्ट्र बँकेमध्ये तुम्ही ही मदत जमा करू शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र
खात्याचं नाव – BEO&HM, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, भोकरदन
खाते नंबर – 55206142309
IFS कोड – MAHB0RRBMGB
Ifsc code -MAHB0RRBMGB
A/c no.55206142309
A/c - BEO&HM kgbv bhokardan.

 

 • Amit Shinkar

  Thanks IBN Lokmat for sharing the news…. we will try to help her family financially for sure!!!

 • PREMANAND

  SIR,

  BANK’S NAME GIVEN BY YOU INS bANK OF mAHARASHTRA. WHEREAS ISFC CODE GIVEN BY YOU I .E. MAHABORRBMBG IS OF MAHARASHTRA GRAMEEN BANK

  ISFC CODE OF BANK OF MAHARASHTRA BHOKARDAN BRANCH IS MAHB0000270.

  PLEASE CLARIFY IMMEDIATELY TO PROCEED FURTHER CREDIT TO WRONG ACCOUNT OR DELAY WILL NOT SUFFICE THE PURPOSE.

close