निवडणूक आयोग गोविंदाची चौकशी करणार

March 20, 2009 8:29 AM0 commentsViews: 2

20 मार्च, मुंबई आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी खासदार आणि अभिनेता गोविंदा आता अडचणीत आला आहे. आज निवडणूक आयोग त्याची चौकशी करणार आहे. आचारसंहिता लागू झाली असूनही होळीच्या उत्सवाचं निमित्त करून गोविंदाने जुहू परिसरातील नागरिकांना पैसे वाटल्याचा आरोप त्याच्यावर आहे.त्या संदर्भात गोविंदावर निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. त्याला उत्तर देताना तृतीय पंथीयांना पैसे वाटल्याचं गोविंदा म्हणाला होता. पण आयोगाला हे उत्तर समाधानकारक न वाटल्याने नोटीस बजावली आहे. या मुद्द्यावरून गोविंदाला मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. गोविंदाची आजची हजेरी महत्त्वाची ठरणार आहे. या प्रसंगी जुहू परिसर माझा मतदारसंघात येत नाही आणि यंदा निवडणुकीलाही उभा राहण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नाही, असं सांगून आचारसंहितेचा भंग केला नसल्याचा दावा गोविंदाने केला आहे.

close