कल्पना गिरी हत्येप्रकरणी : दोघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी

March 30, 2014 2:02 PM0 commentsViews: 361

latur30 मार्च :  लातूर काँग्रेस पदाधिकारी कल्पना गिरी यांच्या हत्ये प्रकरणी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षासह आणखी एकाला अटक करण्यात आलीय. शहर अध्यक्ष महेंद्रसिंह चौहान आणि सदस्य समीर किल्लारीकर अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. या अटकेमुळे लातूर काँग्रेसमध्ये खळबळ माजलीय.

आठ दिवसांपूर्वी कल्पना गिरी यांचा मृतदेह तुळजापूर जवळच्या तलावात सापडला होता. गिरी यांचं अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. कल्पना यांनी युवक काँग्रेसची निवडणूक लढवू नये असा अनेक पदाधिकार्‍यांचा आग्रह होता. पण कल्पना यांनी दबावाला बळी न पडता निवडणूक लढवली. या पार्श्वभूमीवर अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणावर बोलायला लातूर काँग्रेसच्या पदाधिकर्‍यांनी नकार दिलाय.

close