युतीच्या प्रचाराचा नारळ आज मुंबईत फुटणार

March 20, 2009 8:30 AM0 commentsViews: 2

20 मार्च, मुंबई शिवसेना आणि भाजपमधले वाद मिटून आता दोन्ही पक्ष निवडणुकीच्या जोरदार प्रचाराला लागले आहेत. आज संध्याकाळी वडाळ्याच्या स्वान मील कम्पाऊन्डमध्ये युतीच्या प्रचाराचा नारळ संध्याकाळी 6.00 वाजता फुटणार आहे.या संयुक्त मेळाव्यात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

close