आशा भोसलेंच्या सुरांनी संमेलनाला सुरुवात

March 20, 2009 2:49 PM0 commentsViews: 1

20 मार्च, महाबळेश्वर संमेलनस्थळ ते अध्यक्षपद अशा अनेक बाबतीत गाजलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या महाबळेश्वरमध्ये भरलेल्या 82 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा श्रीगणेशा आशा भोसले यांच्या स्वरमयी भाषणाने झाला. संमेलनाच्या सुरुवातीलाच अध्यक्षपदावरून झालेला वाद मिटला असतानाच ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनावरून महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले – पाटील आणि माजी अध्यक्ष म.द. हातकणंगलेकर यांच्यात वाद झाला. त्यांनतर संतप्त झालेले म.द. हातकणंगलेकर संमेलन स्थळावरून निघून गेले. साहित्यदिंडी, शोभायात्रा अशा पारंपरिक कार्यक्रमांसोबत संमेलनात ' मानापनाचं नाटक चांगलंच रंगलं.

close