काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं 26 -22 फॉर्म्युल्यावर एकमत

March 20, 2009 3:18 PM0 commentsViews: 3

20 मार्च, नवी दिल्ली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली जागावाटपाची बोलणी पूर्ण झाली. 26-22 या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते तारीक अन्वर यांनी दिली.काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दिल्लीत 10 बैठका झाल्यानंतर काल अकरावी बैठक मुंबईत पार पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे, छगन भुजबळ, आर.आर.पाटील हजर होते. जालना आणि उस्मानाबाद या मतदारसंघांबाबतचा तिढा सुटल्याचं समजतंय. एकीकडे जालना राष्ट्रवादीला तर उस्मानाबाद काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले शिर्डीतूनच लढतील. आरपीआयच्या निवडणूक चिन्हावरच लढतील असं निश्चित करण्यात आलं आहे.

close