कसाबला फाशी देण्याची मागणी सरकारचीच – जयंत पाटील

March 21, 2009 5:10 AM0 commentsViews: 3

21 मार्च, सांगली 26 /11 चा एकमेव जिवंत आरोपी मोहमद अजमल कसाबला फाशी देण्याची मागणी सरकारनं चार्जशीटमध्ये केली आहे, अशी माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी आयबीएन लोकमतला दिली. सांगलीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. आरोपी अजमल कसाबला फाशी देण्याची मागणी विरोधक करत आहेत. तर या मागे नेमकी सरकारची भूमिका काय आहे, असं कार्यक्रमात जयंत पाटील यांना विचारलं होतं. त्याला उत्तर देताना त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. या आधी आरोपीला फाशी देण्याची मागणी सरकारने कधीही केली नव्हती. पण सरकारने ती केली असून, ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे , असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

close