सतीश शेट्टी हत्या: कोर्टाने मागितले राज्य सरकाराकडे उत्तर

March 31, 2014 5:57 PM0 commentsViews: 326

Image img_85662_satishshetty_240x180.jpg31 मार्च : आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाचं वळण लागलंय. याप्रकरणी सीबीआयने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आता आयआरबीचे एम.डी.वीरेंद्र म्हैसकर आणि काही अधिकारी अडचणीत आलेत.

सीबीआयच्या या याचिकेवर राज्य सरकारकडून हायकोर्टाने मत मागवलंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी 4 एप्रिलला होणार आहे. सतीश शेट्टींनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे जवळच्या जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली याचिका दाखल केली होती.

या भूखंड प्रकरणाच्या चौकशीची सीबीआयने परवानगी मागितलीय. या प्रकरणी सीबीआयने पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले होते. आयआरबीचे एमडी वीरेंद्र म्हैसकर यांच्याविरोधात सतीश शेट्टींनी तक्रार दाखल केली होती.

close