पैसे वाटप करताना परांजपेंच्या कार्यकर्त्यांना अटक

March 31, 2014 6:16 PM0 commentsViews: 2351

dombivali_anand_paranjpe31 मार्च : राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकांना पैसे वाटप करत असताना अटक करण्यात आलीय. यावेळी कार्यकर्त्यांकडून 1 लाख 10 हजार रुपये जप्त करण्यात आले.

परांजपे यांच्या डोंबिवली एमआयडीसी येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर हा प्रकार घडला. आनंद परांजपे लोकसभेसाठी कल्याणमधून निवडणूक लढवत आहेत. रिक्षांमागे प्रचाराचे पोस्टर्स लावण्यासाठी पैसे वाटप होतं सुरू होतं. त्यावेळी 3 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली या कार्यकर्त्यांकडून 1 लाख 21 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आनंद परांजपेंनी कार्यकर्त्यांची बाजू घेतली. प्रचारासाठी 120 रिक्षा भाड्याने घेण्यात आल्या आहेत. त्याचा सर्व हिशेब निवडणुकीच्या खर्चात दाखवेन. त्यामुळे आम्ही आचारसंहितेचा कसलाही भंग केला नाही असं परांजपेंनी स्पष्ट केलं.

close