महेंद्रसिंग चौहाननेच कल्पनाला तलावात ढकलले

March 31, 2014 8:56 PM0 commentsViews: 4838

kalpanagiri_latur4531 मार्च : लातूरच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्या कल्पना गिरी हत्याप्रकरणी मोठा खुलासा झालाय. युवक काँग्रेसचा निलंबित शहराध्यक्ष महेंद्रसिंग चौहान याने कल्पनाला तलावात ढकलल्याची कबुली दिली आहे. महेंद्रनंच कल्पनाला तलावात ढकललं.

कल्पनाच्या हत्येप्रकरणी महेंद्र आणि त्याच्यासोबत काँग्रेस सदस्य समीर किल्लारीकर यांना सध्या 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कल्पनाला महेंद्रसिंगनंच तलावात ढकललं. अशी कबुली समीरनं दिली आहे. कल्पनाचा मोबाईल महेंद्रच्या वडिलांच्या विहिरीत सापडला होता. दरम्यान,

कल्पना गिरी यांच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आज (सोमवारी) आला. या रिपोर्टमध्ये फुप्फुसात पाणी जाऊन मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. पण कल्पना यांच्या कुटुंबीयांनी कल्पनावर बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

कल्पना गिरी यांचा मृतदेह नऊ दिवसांपूर्वी तुळजापूर जवळच्या तलावात सापडला होता. या प्रकरणी लातूरच्या युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष महेंद्रसिंह चौहान आणि काँग्रेस सदस्य समीर किल्लारीकर यांना अटक करण्यात आली. या दोघांही 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या कारवाईनंतर चौहानची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. कल्पना यांचं अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे.

close