महाराष्ट्रातल्या आयपीएल सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंना नो एन्ट्री – उद्धव ठाकरे

March 21, 2009 6:01 AM0 commentsViews: 1

21 मार्च, मुंबई महाराष्ट्रात होणार्‍या आयपीएल सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला. शिवसेना – भाजप युतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी मुंबई, परळ इथल्या स्वान मिल कम्पाऊण्ड इथे झाला. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेची छुपी युती नाही असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केलं.या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंगही हजर होते. केंद्रात सत्तेवर आलो तर अफझल गुरूला लगेच फाशी देऊ, असं राजनाथ सिंग यांनी मेळाव्यात जाहीर केलं. दहशतवाद आणि मंदीच्या मुद्यावर सरकारवर टीका करत दोघांनी मतदारांना आवाहनही केलं. त्यावेळी मुंबईत होणार्‍या आयपीएल च्या सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळू देणार नाही, असा इशारा उध्दव ठाकरे यांनी दिला

close