मुंबईत बेस्टच्या कर्मचार्‍यांनी पुकारला संप

April 1, 2014 9:10 AM1 commentViews: 1318

images1 एप्रिल :  12 तासांच्या ड्युटीच्या विरोधात आज मुंबईत बेस्टच्या (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्स्पोर्ट) कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईकरांचे मात्र हाल होतं आहेत. बस्टेची सेवा नसल्याने सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांची चांगलीच पळाळ झाली, तर परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे देखील याचा फटका बसला आहे.

आजपासून 12 तासांची ड्युटी लावणारे कॅनेडियन वेळापत्रक लागू करण्यात आलं. त्यामुळे वाहक आणि चालक संतापले आहेत.

कॅनेडियन वेळापत्रकाप्रमाणे 4 तासांची ड्युटी, 4 तासांची विश्रांती आणि मग पुन्हा 4 तासांची ड्युटी असं विचित्र वेळापत्रक बेस्ट प्रशासनानं आणलं आहे. औद्योगिक न्यायालयानं या वेळापत्रकाला दिलेली स्थगिती हायकोर्टाने उठवली आहे. त्यामुळे आजपासून हे वेळापत्रक बंधनकारक करण्याचा बेस्ट प्रशासनाने निर्णय घेतला आहे. बेस्ट प्रशासनाच्या या निर्णयामुळे कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त करत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

जवळजवळ 13 हजार बस ड्रायव्हर आणि साधारण तेवढेच कंडक्टर आज सकाळी अचानक संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, चाकरमाने आणि विद्यार्थी मात्र वेठीस धरले गेले आहे.

संपाची कल्पना नसलेल्या आणि सकाळी ऑफिसमध्ये जाण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांनी बस नसल्यानं रिक्क्षाची वाट धरली. बेस्टच्या थांब्यावरही प्रवाशांच्या रांगा लागल्या. सध्या परिक्षांचे दिवस असल्यानं विद्यार्थ्यांनाही या संपाचा फटका बसला. या अचानक पुकारलेल्या संपाबद्दल प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, 1 वाजता लोअर परेल इथं शरद राव यांची पत्रकार परिषद होणार आहे, तर आझाद मैदानावर 4 वाजता बेस्ट कामगारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

बेस्ट वेळापत्रक

 • बेस्टच्या सुमारे 4000 बसेस
 • त्यापैकी सुमारे 2 टक्के बसेस (सुमारे 350 बसेस) ह्या कायम तांत्रिक बिघाडामुळे किंवा कामगारांच्या कमतरतेमुळे आगारात असतात
 • बेस्ट परिवहनाचे एकूण 26,000 कर्मचारी आहेत.
 • पूर्वी जुन्या वेळापत्रकाप्रमाणे 9 तासांची ड्युटी असायची त्यात 8 तास काम आणि 1 तास विश्रांती
 • आत्ता कॅनेडीयन वेळापत्रकाप्रमाणे कामाचे तास वाढवून 12 करण्यात आले आहेत. ज्यात 4 तासांची सक्तीची विश्रांती देण्यात आलेली आहे.
 • कर्मचार्‍यांच्या मते या वेळापत्रकामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर विपरित परिणाम होणार आहे.
 • तर बेस्ट प्रशासन मात्र बेस्ट परिवहनाला फायद्यात आणण्याचा प्रयत्न करतय.
 • विशेष म्हणजे औद्योगिक न्यायालयानेही 29 मार्चला या वेळापत्रकाला मंजुरी दिली आहे.
 • Shailesh pAtil

  bar kel best cha maj utrwala pahije sale adhikari paise khawun kamgarana tras detat

close