अमेठीत तिरंगी लढत; भाजपकडून स्मृती इराणींना उमेदवारी

April 1, 2014 11:25 AM0 commentsViews: 1501
smriti-rahul_650_0401140126571 एप्रिल : अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपकडून खासदार स्मृती इराणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर रायबरेली मतदारसंघातून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाजपनेसुप्रीम कोर्टातील वकील अजय आगरवाल यांना उमेदवारी दिली आहे.
उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. भाजपने सोमवारी पक्षाच्या संकेतस्थळावर सातवी यादी जाहीर करून याबाबतची घोषणा केली.
अमेठीत इराणी यांना उमेदवारी देण्यात आल्याने, येथे तिरंगी लढत होणार आहे. आम आदमी पक्षाकडून येथे कुमार विश्वास लढत आहेत. त्यामुळे राहुल गांधी, स्मृती इराणी व कुमार विश्वास यांच्यातील लढतीकडे देशाचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, सक्षम उमेदवाराविरोधात लढायला मिळतंय, ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे,अशी प्रतिक्रिया स्मृती इराणी यांनी दिली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मला अमेठीतून निवडणूक लढवायला मिळतीये, माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे मी भारावून गेलीये, असंही इराणी म्हणटलं आहे.

 

close