सिंधुदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बोलेरो गाडीला अपघात

April 1, 2014 12:44 PM1 commentViews: 1245

bolero accident1 एप्रिल :  सिंधुदुर्ग पोलिसांनी 13 नव्या बोलेरो गाड्या ताब्यात घेतल्यानंतर त्यातल्या एका गाडीला काल रात्री अपघात झाला. सिंधुदुर्ग पोलिसांना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी आणलेल्या 13 नव्या बोलेरो गाड्या ताब्यात घेतल्यानंतर पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तणावात एका बोलेरोच्या अपघातामुळे आणखी भर पडलीये.

पोलिसांनी जप्त केलेली गाडी कणकवलीहून ओरोस पोलीस मुख्यालयात नेण्यात येत असताना काल रात्री वागदे गावाजावळ या बोलेरोनं एका बाईकस्वाराला धडक दिली. त्यात बाईकस्वार गंभीर जखमी झाला. पोलीसच ही गाडी चालवत होते. बोलेरो जप्त केल्यामुळे संतप्त झालेले काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने अपघातानंतर घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी जादा कुमक मागवावी लागली. पण घटनास्थळावरून न हटता या कार्यकर्त्यांनी अपघातग्रस्त बाईकस्वाराच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून पोलिसांनी 75 हजार रुपये द्यावेत आणि त्याच्या उपचाराचा सर्व खर्च करावा अशी मागणी केली.

अखेर पोलिसांनी ही मागणी मान्य केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, या घटनेमुळे सिंधुदुर्ग पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांदरम्यान तणाव वाढलाय. या अपघाताला जिल्हा पोलीस अधीक्षकांची बोलेरोवरची कारवाईच कारणीभूत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केलाय.

  • rakesh sawant

    हा खर्च पोलिकंकडून न घेता कॉंग्रेस वाल्यांकडून घ्याला हवा होता.

close