माफियांनी तयार केली चक्क डिझेलची विहीर

April 1, 2014 3:37 PM0 commentsViews: 5258

diseal mafia1 एप्रिल :  ठाण्यात डिझेल माफियांनी डिझेल चोरीची नवीन युक्ती शोधून काढली आहे. हे माफिया ठाण्यातल्या बाळकुम परिसरात भारत पेट्रोलियमच्या पाईपलाईन फोडून डिझेलची चोरी करतात. चेंबूरवरुन मनमाडला जाणारी ही डिझेलची पाईपलाईन फोडून त्यांनी लाखो लिटर डिझेल चोरलं आहे.

चोरी केलेलं डिझेल साठवण्यासाठी या ऑईल माफियांनी चक्क विहीरच बनवली आहे. कापूरबावडी पोलीस आणि भारत पेट्रोलियमच्या कर्मचार्‍यांनी डिझेलचे 50 कॅन जप्त केलं आहे. कापुरबावडी पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

close