सलमानला दिलासा, सुनावणी लांबणीवर

April 1, 2014 4:45 PM0 commentsViews: 375

salman_khan_hit_&_run01 एप्रिल : 2002 च्या हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला आणखी एक दिलासा मिळालाय. या प्रकरणी सलमान खान आज (मंगळवारी) कोर्टात हजर झाला. कोर्टाने या खटल्याची सुनावणी आता 28 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.

मागील आठवड्यात 26 मार्च रोजी साक्षीदार नसल्यामुळे सुनावणी 8 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती आता कोर्टाने याची सुनावणी आता 28 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. कोर्टातून निघाल्यानंतर सलमाननं हाजी अली दर्ग्याला भेट दिली.

हिट अँड रन प्रकरणी सलमानवर आधी निष्काळजीपणाने गाडी चालवण्याचा गुन्हा होता. नंतर त्याच्यावर अधिक गंभीर असा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावण्यात आला. त्यामुळे त्याच्याविरोधातला खटला नव्याने सुरू करावा असा आदेश कोर्टाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिला होता.

या प्रकरणी सलमान खानवर आयपीसी 304 (2) या कलमानुसार सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात आलाय. मुंबईक 2002 साठी सलमान भरधाव गाडी चालवून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जखमी झाले होते. या प्रकरणी त्याच्यावर रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर आयपीसी 304 (2) नुसार सदोष मनुष्यवधाच्या गुन्हाखाली खटला दाखल करण्यात आला. या खटल्यात जर सलमान खान दोषी आढळला तर त्याला जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे.

close