उद्धव ठाकरेंच्या आक्षेपार्ह भाषणाची चौकशी होणार

March 21, 2009 10:01 AM0 commentsViews: 5

21 मार्च, मुंबई शुक्रवारी मुंबईत सेना-भाजप युतीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची चौकशी होणार आहे. उद्धव यांनी आपल्या भाषणात काही प्रक्षोभक विधानं केली होती. केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून हल्ला केला होता. तसंच सरकारबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारल्या प्रकरणी मुंबईच्या जिल्हाधिका-यांनी त्यांच्या भाषणाची सीडी मागवली आहे. महाराष्ट्रात होणार्‍या आयपीएल सामन्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शुक्रवारी झालेल्या शिवसेना – भाजप युतीच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेची छुपी युती नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं. या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंगही हजर होते.

close