संजय खोडकेंची वेगळी चूल, वर्‍हाड विचार मंचची स्थापना

April 1, 2014 2:04 PM0 commentsViews: 1183

01 एप्रिल : राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आलेले प्रदेश प्रवक्ते संजय खोडके यांनी वेगळी चूल मांडलीय. खोडके यांनी वर्‍हाड विचार मंच या संघटनेची स्थापना केलीय. त्यांनी बसपचे उमेदवार गुणवंत देवपारे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे खोडके नाराज होते. त्यांनी राणांच्या उमेदवारीला विरोध केला. यामुळे पक्षाने खोडकेंची हकालपट्टी केली. सोमवारी संजय खोडकेंनी आपल्या समर्थकांची अमरावतीतल्या छत्री तलाव इथं बैठक घेतली. खोडके हे राष्ट्रवादीचे शरद पवारांचे जवळचे सहकारी समजले जात होते.

close