कोर्टाचा दणका, बेस्टचा संप बेकायदेशीर !

April 1, 2014 6:28 PM1 commentViews: 1166

423court_on_bus_strick01 एप्रिल : बेस्ट कर्मचार्‍यांचा संप चिघळणार अशी चिन्हं दिसत आहे. बेस्ट कर्मचार्‍यांचा संप बेकायदेशीर आहे, असा दणका मुंबई हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे आता बेस्टचे कर्मचारी कामावर परतणार का हा प्रश्न आहे. बेस्ट प्रशासनाने आज (सोमवारी) बोलावलेल्या बैठकीला बेस्ट कर्मचार्‍यांचे प्रतिनिधी गैरहजर राहिले.

12 तासांची ड्युटी अन्यायकारक असून आपण संपावर ठाम असल्याचं कामगार नेते शरद राव यांनी सांगितलं. बेस्ट बसेसबरोबरच उद्या रिक्षाही बंद ठेवण्याचा इशारा शरद राव यांनी दिलाय. शरद राव यांनी बेस्टच्या नव्या वेळापत्रकाला कडाडून विरोध केलाय. बेस्ट व्यवस्थापनाची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. व्यवस्थापन कर्मचार्‍यांची पिळवणूक करत आहे. त्यामुळे जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असा इशारा शरद राव यांनी दिला.

मात्र या संपामुळे गुढीपाडव्याच्या सुट्टीनंतर आज कामाला निघालेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली. मुंबईत बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्स्पोर्ट म्हणजेच बेस्टच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारला. जवळजवळ 13 हजार बस ड्रायव्हर आणि साधारण तेवढेच कंडक्टर आज सकाळी अचानक संपावर गेले. 12 तासांच्या ड्युटीच्या विरोधात हा संप आहे. या संपामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. आजपासून 12 तासांची ड्युटी लावणारे कॅनेडियन वेळापत्रक लागू करण्यात आलंय.

त्यामुळे वाहक आणि चालक संतापले आहेत. कॅनेडियन वेळापत्रकाप्रमाणे 4 तासांची ड्युटी, 4 तासांची विश्रांती आणि मग पुन्हा 4 तासांची ड्युटी असं विचित्र वेळापत्रक बेस्ट प्रशासनाने कर्मचार्‍यांवर लादलंय. औद्योगिक न्यायालयाने या वेळापत्रकाला दिलेली स्थगिती हायकोर्टाने उठवलीय. त्यामुळे आजपासून हे वेळापत्रक बंधनकारक करण्याचा बेस्ट प्रशासनाने निर्णय घेतलाय. मात्र संपाची कल्पना नसल्यामुळे आणि सकाळी ऑफिसमध्ये जाण्यासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्याची पुरती वाट लागली.

  • Pratik Shinde

    Canada Schedule tar BEST committee ( Sena party) chi hi pheli kheli ahe BEST private karun vikaychi. I want tell to all my people living in Mumbai, Navi Mumbai & Thane that if BEST buses is not for 2 days how the pay rate hikes double triple etc think if BEST get private?
    This is not BEST employees right, it is our right. They are also like us do we people can work 12 hours (some people comes from Panvel, Badlapur, Virar ) that means total 16 hours away from home. All people should come in support of BEST employees and I think it will solve in 1 day. Reject Canada schedule and bring old schedule.

close