उमेदवार रिंगणात

April 1, 2014 9:11 PM0 commentsViews: 1027

01 एप्रिल : मुंबईच्या उपनगरांमध्ये आज (मंगळवारी) अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. काँग्रेसच्या गुरुदास कामत यांनी सकाळी 11 वाजता वांद्रे कलेक्टर ऑफिसमध्ये अर्ज भरला. त्यांच्याच पक्षाच्या प्रिया दत्त यांनी अर्ध्या तासानंतर 11.30 अर्ज भरला. त्याआधी त्यांनी प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतलं. अपक्ष उमेदवार राखी सावंत यांनी 12 वाजता उमेदवारीचा अर्ज भरला. त्याआधी त्यांनी सकाळी 9 वाजता ओशिवरा इथून पदयात्रा काढली. भाजपचे गोपाळ शेट्टींनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

close