मनसेची मान्यता रद्द करा, याचिका दाखल

April 1, 2014 9:33 PM1 commentViews: 9241

delhi_mns_01 एप्रिल : महाराष्ट्र नव निर्माण सेने (मनसे)ची मान्यता रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहेत. मनसेच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर असल्याचं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे.

त्यावर निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचे निर्देश दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. त्यासाठी हायकोर्टाने दोन दिवसांची मुदत दिलीय. आचारसंहिता भंग झाली असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल, असंही कोर्टाने स्पष्ट केलंय.

निवडणूक आयोगाच्या उत्तरानंतर याचिकाकर्त्याचं समाधान झालं नाही तर पुन्हा सुनावणीची मुभा देण्यात आलीय.

  • tejas

    chukich ahe

close