राज ठाकरेंना नाशिक पोलिसांनी बजावली नोटीस

March 21, 2009 10:15 AM0 commentsViews: 2

21 मार्च, नाशिक मनसे आज लोकसभा निवडणूक प्रचाराच्या तयारीत असताना सभेपूर्वीच नाशिक पोलिसांनी राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. " जपून भाषण करा. समाजात तेढ निर्माण होणार नाही. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत. याची खबरदारी घ्या, " अशी सूचना पोलिसांनी राज यांना नोटीसीमधून केली आहे. कलम 144 नुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला राज ठाकरे सामोरे जात आहेत. राज्यातील प्रचाराला सुरुवात करणा-या राज ठाकरे यांच्या या सभेत कोणते मुद्दे मांडण्यात येतील याबद्दल कुतूहल आहे. त्यामुळेच मनसेचा बालेकिल्ला असणा-या नाशिकमध्ये लाखोंच्या पटीने गर्दी खेचण्याची या सभेत ताकद आहे.

close