पवारांना ‘त्या’ व्यक्तव्याबद्दल निवडणूक आयोगाने केलं माफ !

April 1, 2014 10:59 PM1 commentViews: 1073

g46ec_sharadpawar01 एप्रिल : “सातार्‍यात 17 तारखेला घडाळ्यावर शिक्का हाणा आणि मुंबईत 24 तारखेला पहिली शाई पुसून पुन्हा घड्याळाला मतदान करा” असा अजब सल्ला देणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे.

शरद पवारांनी दिलेलं स्पष्टीकरण पुरेसं नाही असं म्हणत निवडणूक आयोगाने नापसंती व्यक्त केली आहे. पण पश्चाताप व्यक्त केल्यानं हे प्रकरण पुढे नेणार नाही असं म्हणत आयोगाने पवारांना दिलासा दिलाय. ज्येष्ठ नेता म्हणून पवारांनी यापुढे जबाबदारीनं वागावं आणि आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचनाही निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

मागील महिन्यात नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात शरद पवार यांनी दोनदा निवडणुकीचा सल्ला देऊन खळबळ उडवून दिली होती. गेल्यावेळी साताराच्या आणि मुंबईची निवडणूक एकाचवेळी आली होती. पण आता यावेळी सातार्‍यात 17 तारखेला मतदान आहे आणि मुंबईला 24 तारखेला आहे. त्यामुळे तिथे घड्याळावर शिक्का हाणायचा आणि नंतर इथेही शिक्का हाणायचा फक्त पहिली शाई पुसून टाका नाहीतर घोटाळा व्हायचा असा अजब सल्ला पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता.

प्रथमदर्शनी हा आचारसंहितेचा भंग असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं पवारांकडून स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी दोनदा मतदानासंबंधी केलेल्या वक्तव्याबद्दल निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण दिलं. आपल्या वक्तव्यामुळे जो गोंधळ उडाला आणि गैरसमज झाला, त्याबद्दल आपल्याला अत्यंत खेद होत असल्याचं त्यांनी म्हटलं. हा मुद्दा इथेच संपवावा, अशी विनंतीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

  • Prakash Patel

    as sting operation done by aajtak channel there exists a chemical that can clean election ink mark and many politicians has ordered for purchase of the same. so do not leave Pawarsaheb without thorough inquiry or otherwise people will loose faith in election and election commissioners

close