कोल्हापुरात टोल प्रश्न पुन्हा ऐरणीवर

April 2, 2014 2:07 PM0 commentsViews: 526

TOll IRB02 एप्रिल : कोल्हापूरमध्ये ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीतच टोलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोल्हापूरमधल्या वादग्रस्त टोलला हायकोर्टाने 26 फेब्रुवारी रोजी स्थगिती दिली होती. पण आता रस्ते विकास महामंडळाने आयआरबी कंपनीला रस्ते विकास प्रकल्पातील शिल्लक राहिलेली काम तत्काळ पूर्ण करावीत अस पत्र दिलंय.

त्यामुळे काम पूर्ण करुन पुन्हा एकदा आयआरबी शहरात टोल वसुली सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीच आज (बुधवारी) कोल्हापूरमध्ये टोल विरोधी कृती समितीने एक महत्वाची बैठक बोलावलीय.

या बैठकीला शेकपाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी.पाटील आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंदराव पानसरे यांच्यासह टोलविरोधी कृती समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमधून पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

close