मोदींच्या नावावर मतं मागू नका, मुंडेंचा राजना टोला

April 2, 2014 4:54 PM0 commentsViews: 3202

raj_munde02 एप्रिल : राज यांना स्वत :च्या नावावर मतं मिळत नसल्यामुळे आता नरेंद्र मोदींच्या नावावर मतं मागावी लागता हे राज यांचे फेल्युर नाही का? असा सणसणीत टोला भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.

तसंच राज जर इतके लोकप्रिय नेते असतील तर त्यांना आता नरेंद्र मोदींचं नाव का घ्यावं लागलं ? याच त्यांनी उत्तर द्यावं असंही मुंडे म्हणाले. मुंडे यांनी आयबीएन लोकमतशी खास बातचीत केली यावेळी त्यांना राज यांच्या टीकेचा समाचार घेतला.

महायुती बळकट होण्यासाठी राज आणि उद्धव एकत्र यावं यासाठी आपण प्रयत्न केला होता. पण हातीकाही यश आलं नाही त्यामुळे हे दोघे एकत्र येऊ शकत नाही असंही आपण दोन महिन्यापूर्वीच सांगितलं होतं. त्याबद्दल आता जर कुणाला टीका करायची असले तर करू द्या पण त्यावर आपल्याला काहीही बोलायचं नाही असंही मुंडे म्हणाले.

मग पवारांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल

“नरेंद्र मोदींच्या डोक्यावर परिणाम झाला” अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. पवारांच्या टीकेला मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलंय. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याने विरोधी पक्षातील नेत्याबद्दल अशी भाषा वापरणे हे पवारांना शोभणारं नाही. मोदींना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल असं पवार म्हणताय मग पवारांच्या इच्छेप्रमाणे जर त्यांना एनडीएमध्ये घ्यायचं ठरलं तर तुम्हाला ठाण्यातील वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागले अशी खोचक टीकाही मुंडे यांनी केलीय.

close