वरुण गांधींनी केलं राहुल गांधींचं कौतुक

April 2, 2014 2:09 PM0 commentsViews: 1282

varungandhi_rahulgandhi02 एप्रिल : भाजप नेते आणि राहुल गांधींचे चुलत भाऊ वरुण वरूण गांधी यांनी राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळलीय. एका बैठकीत भाजप नेते वरुण गांधी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचं कौतुक केलं.

आपल्या अमेठीच्या मतदारसंघात राहुल यांच्या कामाचं वरुणनं कौतुक केलं. ज्या प्रमाणे राहुल गांधी यांनी अमेठीत सेल्फ हेल्प ग्रुपचा फॉर्म्युला यशस्वी केला तसंच लघु उद्योगांना प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा शब्दात वरूण गांधी यांनी राहुल यांचं कौतुक केलं.

राहुल गांधी यांनीही याची दखल घेत आमच्या कामाचं कौतुक होतंय याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया दिली. पण वरुण गांधी यांच्या कौतुकामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना नाराजी व्यक्त केलीय

close