राजची पक्षासाठी मेहनत पण उद्धवना सहज मिळालं -पवार

April 2, 2014 7:42 PM2 commentsViews: 2395

pawar_raj_udhav02 एप्रिल : राज ठाकरे यांनी स्वत:चा पक्ष मेहनतीने उभा केलाय त्यांचे कष्ट दिसून येतात पण उद्धव ठाकरे भाग्यवान आहे. त्यांना त्यांच्या वडिलांची प्रस्तापित संघटनात्मक प्रॉपर्टी तयार केली ती सहजपणाने मिळालीय असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे बंधूंच्या वादावर आपलं परखड मत व्यक्त केलंय.

अलिबाग इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं राजकारण करू नये. जर एखाद्या पक्षातील(भाजप) नेते दुसर्‍या पक्षाच्या (मनसे) अध्यक्षांना पक्षांतर करण्यासाठी वारंवार भेट घेऊन आग्रह करत असतील तर यावरून असे स्पष्ट होते की, ज्या पक्षांची युती झालीय तिचा कारभार कसा चाललाय हे दिसून येतंय अशी बोचरी टीकाही पवारांनी सेनेवर केली.

मागील निवडणुकीत मनसेला मिळालेली मत आणि यश पाहता त्यांना नाकारता येणार नाही. तसंच राज ठाकरे यांच्या सभेला होत असलेली गर्दी पाहता त्यांची प्रगती दिसून येतेय अशा शब्दात शरद पवारांनी राज यांची पाठ थोपाटली. तर राज यांचे यश पाहून अस्वस्थ झालेले उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीका करत आहे अशी टीकाही पवारांनी केलीय.

  • adi

    pawar tevde changlE karma karavE lagtat mhanun UDHAVSAHEBANCHYA NASHIBI paksachi dhura ahe konala hi te shaj bhetat nahi ani pawar tumhi mns badal bolat tyache tumgi godve ganar karan tumchya talaver nachtat na ani tumhala faydya hoto mhanun pawr mnsche godve gatat

  • amol

    pawar ani raj madhe setting jhali ahe..100% …..atta maratahi manus phasnar nahi….raj ni shivsene virudh umedvar ka ubhe kele…..he realy doing wrong politics….pan marathi manus shiv sene barabar ahe..ani rahnar……..

close